मुष्टीयुद्ध स्पर्धेत शिवा थापाचा सोनेरी ठोसा

File pic

नवी दिल्ली – भारताचा आशियाई पदक विजेता खेळाडू शिवा थापा याने कझाकिस्तानमधील अध्यक्षीय चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू आहे.

आगामी ऑलिंपिक स्पर्धेत 63 किलो गटाचा समावेश करण्यात आला आहे. या गटात थापा सहभागी झाला होता. या गटातील अंतिम फेरीत त्याचा प्रतिस्पर्धी झाकीर सफिउद्दिन याने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे थापा याला विजेतेपद बहाल करण्यात आले. सफिउद्दिन याने यंदा आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील उपांत्य फेरीत थापा याला पराभूत केले होते.

थापा याने सांगितले की, सफिउद्दिन विरूद्ध विजय मिळविण्या साठी मी खूप मेहनत घेतली होती. या नवीन गटात लढताना मला खूप त्रास झाला नाही. ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. थापाने अध्यक्षीय स्पर्धेतील उपांत्य फेरीत किर्गिझस्तानच्या एर्गोन कादिरीबेकुलु याच्यावर 4-1 असा विजय मिळविला होता. भारताच्याच स्विटी बुरा व दुर्योधनसिंग नेगी यांना ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)