सातारमध्ये अवतरला शिवकाळ

शिवजयंती मिरवणुकीत आकर्षक चित्ररथ

सातारा – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकाल चित्ररथाच्यामाध्यमातुन सातारा नगरपरिषदेच्या शाळांनी प्रत्यक्षात उभा केला.खासदार श्री.छ.खा उदयनराजेच्या प्रमुख उपस्थितीत शस्त्रास्त्र प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर श्री.छ. थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार घालुन नित्यवर्षी प्रमाणे शिवजयंत्तीनिमीत्त मिरवणुकीची सुरवात झाली. शिवाजी उदयमंडळाच्या मानाच्या पालखीने मिरवणुकीची सुरूवात झाली. यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक, नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी सातारा शहरात नगरपरिषदेच्या वतीने अत्यंत सुंदर असे नियोजन केल्याचे पहायला मिळाले. एक झुंज वादळाशी हे शुंभु राजेंचे महानाटय, शालेय विद्यार्थ्यांची पोवाडे स्पर्धा तसेच शिवकालीन शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन पहायला सातारकर नागरिकांनी गर्दी केली होती. सातारा नगरपरिषदेच्या सर्व शाळांनी बाल, युवा शिवांजीचे पराक्रम आपल्या दर्जेदार पध्दतीने चित्ररथातुन साकारले होते. यामध्ये पारंपारिक पोशाखातील बाल मावळे, शिवाजी महाराज, अश्वारूढ शिवाजी महाराज साकारलेले पाहण्यासाठी राजवाड्यापासुन दुतर्फा सातारकर नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. ढोल ताश्‍याच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीमध्ये शिस्त व बालचमुंच्चा उत्साह गगनाला भिडला होता.

जणु काय शिवकाळच अवतरल्याचे आज जाणवत होते. यामध्ये विशेष म्हणजे शाळांमधील शिक्षकांनी देखील पारंपरीक पोषाख परिधान केले होते. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गोडवे गाताना प्रतापगडावरील अफझल खान वध, मुरारबाजीचा पराक्रम, शिवजन्म सोहळा, बाजी प्रभु व शिवबा घोडखिंडीत, रायरेश्वराची शपथ, गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे,शिवराज्याभिषेक, जिजामाता आणि शिवाजी महाराज, असे अनेक चित्ररथ शाळांनी मोठया खुबीने हूबेहुब बनविले होते. यामध्ये सातारा शहरातील नगरपरिषदेअंतर्गत येणार्या सर्व शाळा व त्यांचे चित्ररथ सहभागी झाले होते. शहरामध्ये विविध ठिकाणी शिवजंयत्ती निमीत्त शिवमय वातावरण तयार झाले होते.

सर्वत्र चौकामध्ये पताका, भगवे ध्वजांनी आकर्षक विद्युत रोषणाईने तसेच पोवाड्यांनी शहरामध्ये एकच जल्लोष उसळला होता. लहान थोर अबाल वृध्दांपासुन शिवजंयत्ती साजरी करण्याचा जल्लोष आज पहायला मिळाला. शहरात अनेकांनी आपल्या घरामध्ये देखील शिवप्रतिमा बसवुण अनोख्या उपक्रमांनी शिवजंयत्ती साजरी केली. ढोल ताश्‍या व आकर्षक चित्ररथांची मिरवणुक राजवाड्यापासुन, मोती चौक मार्गे , कमानी हौद, शेटे चौक मार्गे पोवई नाका शिवतिर्थापर्यंत मिरवणुक मार्गस्थ झाली. पोवई नाका येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)