मुंबई पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ वाढले

मुंबई: मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढून 95 वर पोहचले आहे. कॉंग्रेस नगरसेविकेचे पद रद्द झाल्यामुळे शिवसेनेची उमेदवार नगरसेविका गीता भंडारी विजयी ठरली आहे.

मालाडमधील मालवणी व्हिलेज म्हणजेच प्रभाग क्रमांक 32 च्या कॉंग्रेस नगरसेविका के. पी. केणी यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवले आहे. त्यामुळे याच वॉर्डमधील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना उमेदवार गीता भंडारी यांना नगरसेवक म्हणून आता महापालिका सभागृहात जाता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हायकोर्टाने दिलेल्या निर्यणाची प्रत महापालिका आयुक्त आणि कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ 95 झाले आहे.

गेल्यावर्षी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84, तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला चार अपक्षांचा पाठिंबा आहे, तर भाजपला एक अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा पाठिंबा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)