शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा 

पिंपरी – शिवसेनेने “ब’ क्षेत्रीय कार्यालयात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे व “ब’ प्रभाग अधिकारी संदीप खोत यांना घेराव घातला. शिवसैनिक व नागरिकांच्या प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे देखील या अधिकाऱ्यांना देता आली नाही. घरोघरी कचरा संकलन नवीन करारनामा ठेकेदार धार्जिन असल्यामुळे संबंधित अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे देखील हतबल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

निविदेतील व करारनामामधील अटी – शर्ती यांचा फेरविचार व्हावा, अन्यथा आम्हास शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी दिला.
याप्रसंगी योगेश बाबर, उर्मिला काळभोर, सरिता साने, अनीता तुतारे, अश्‍विनी चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, शर्वरी जळमकर, प्रतिक्षा घूले, कमल गोडांबे, जयश्री काळभोर, वैशाली कुलथे,शैलाताई निकम, वंदना खंडागळे, बाळासाहेब वाल्हेकर, विजय साने, चेतन शिंदे, सचिन चिंचवडे, संतोष घाडगे, सुरेश राक्षे, सर्जेराव मारनुरे, दिलीप भोंडवे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)