शिवसेनेच्या खासदारांचे संसदेत “जय श्रीराम’

नवी दिल्ली: शिवसेनेच्या खासदारांनी बुधवारी राम मंदिराच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी करत संसदेचा परिसर दणाणून सोडला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबविण्यात आले. त्यानंतर आज कामकाज सुरू होण्याच्या आधीच शिवसेनेचे खासदार संसद परिसऱ्यातल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमा झाले. त्यावेळी त्यांच्या हातात घोषणेचे फलक लिहिलेले होते. “पहिले मंदिर, फिर सरकार’, “हर हिंदू की यही पुकार’ अशा घोषणा देत राम मंदिर लवकरात लवकर उभारण्यात यावे, अशी मागणी केली. सरकारने अयोध्येत मंदिर बनविण्यासाठी तातडीने कायदा करावा, अशी शिवसेनेची मागणी आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रखर टीका केली होती. राममंदिर उभारणीसाठी आम्हालाही झोपलेल्या कुंभकर्णांना जागे करायचे आहे. रामाच्या नावाने जी सत्ता मिळवली, त्याची चार वर्षे सरून गेली. पण आमचा राम मात्र अयोध्येतच वनवासात आहे. निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका, “आधी मंदिर, मग सरकार’ अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)