शिवसेना आमदाराचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

चंद्रपूर : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून नाराज उमेदवारांच्या पक्षातील एन्ट्री आणि एक्झिटचे सत्रच सध्या अवघ्या देशामध्ये पाहायला मिळत आहे. अशातच आज शिवसेनेचे चंद्रपूर येथील आमदार सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेला राम राम ठोकला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांनी आज शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सुरेश धानोरकर यांच्या राजीनाम्याबाबत नेमके कारण समजले नसून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)