शिवसेना आमदार राजेश क्षीसागर यांना हायकोर्टाचा दिलासा

निवडणूक याचिका रद्द बातल

मुंबई, (प्रतिनिधी)- कोल्हापूर विधानसभा मतदार संघातून 2014 च्या निवडणूकीत विजयी झालेले शिवसेना आमदार राजेश क्षीसागर यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. या निवडणूकीत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रावर गुन्ह्याची चूकीची माहिती दिल्याचा आरोप करून सत्यजित उर्फ नाना कदम यांनी दाखल केलेली निवडएूक याचिका न्या. साधना जाधव यांनी रद्दबादल ठरविली.

2014 च्या विानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवसेनचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी गुन्ह्यांची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करून उच्च न्यायालयाने निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्यावेळी राजेश क्षीरसागर यांच्यावतीने जेष्ट वकील ऍड. एम.एस. वशी, ऍड.एस.एस. राव आणि महेश कोले यांनी याचिकेतील आरोप फेटाळून लावले. क्षीरसागर यांनी कोल्हापूरवासींयांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी काही आंदोलने केली. त्या संदर्भात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. मात्र निवडणूक आयोगाला गुन्ह्यासंदर्भात प्रतिज्ञापत्रवर माहिती देताना माहितीच्या अधिकारात पोलीस प्रशासनाने दिलेली माहिती सादर केल्याचा दावा केला होता. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय न्यायालयाने आज जाहीर केला आणि कदम यांची याचिका रद्दबातल ठरविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)