शिवसेनेला पटकणारा जन्माला यायचाय : उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे. आम्हाला कुणीही लेचेपेचे समजू नये, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या पण शिवसेना सगळ्यांची वाट लावते, असे म्हणत मोदीवर टिका केली.

देशाच्या छाताडावर बसणारा पंतप्रधान नको
सरकार मजबूर नसेल तरी चालेल पण माझा देश मजबूत असला पाहिजे. गांधी-नेहरुंपासून सगळे पाढे काढा आणि बघा मजबूत सरकार कसं होतं आणि मिली जुली सरकार कसं असत. शत्रूच्या छाताडावर नाही तर देशाच्या छाताडावर बसणारा पंतप्रधान असेल, तर असं मजबूत सरकार काय चुलीत घालायचं का? असा सवाल करत उद्धव ठाकरेनी मोदींवर निशाणा साधला.

मुंबईत आयोजित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, कुणी कुणाशी युती केली तर कुणाची टक्केवारी वाढेल याची मला चिंता नाही. मात्र देशाची आर्थिक टक्केवारी कशी वाढेल याची मला चिंता आहे. त्यामुळे 2019च्या पुढे फक्त शिवसेनाच असणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राम मंदिराच्या मुद्यावरुनही भाजप सरकारवर उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राम मंदिराचा मुद्दाही निवडणुकीसाठीचा जुमला होता का? आता कॉंग्रेस राम मंदिराच्या आड येत असल्याचा आरोप करत आहात. काश्‍मीरच्या मुफ्तीना राम मंदिर हवं होतं का? नितीश कुमार यांनी राम मंदिराला विरोध केला होता का? राम मंदिर कोर्टाचा विषय होता तर बाबरी मशिद कोर्टाचा विषय नव्हता का? असे प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारला राम मंदिराच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)