शिवसेना झाली “लाचार’सेना – नवाब मलिक 

File photo

मुंबई – लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना अफजलखानाची उपमा दिल्यानंतर आज त्यांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी गुजरातमध्ये गेलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. कालपर्यंत अफझलखानाच्या फौजा उतरल्या होत्या आणि आज शिवसेना लाचारासारखी गुजरातमध्ये गेली. शिवसेना ही आता “लाचार’सेना झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे गुजरातमध्ये गेले. त्यांच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी कडाडून टीका केली आहे. शिवसेनेचे जाणे म्हणजे भाजपासमोर अक्षरशः लोटांगण घातले आहे. हे त्यांच्या जाण्याने समोर आले आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एनडीएचे घटकपक्ष बोलावण्यात आले. मात्र, कालपर्यंत गांधीनगरमध्ये कुणीही प्रचाराला यायचं नाही ही भाजपची भूमिका राहिली होती. परंतु आज सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना बोलावून घेण्यात आले. यावरुन अमित शहा हे अडचणीत आहेत, हे स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)