शिवसेनेने शिवसैनिक आणि मतदारांचीही फसवणूक केली -राष्ट्रवादी

शिवसेनेचा अंगार निघाला फुसका बार ; शिवसेनेला अंतर्मनात डोकावून पाहण्याची गरज 

मुंबई: शिवसेनेने भारतीय जनता पार्टीशी केलेल्या युतीबाबात, ‘शिवसेनेचा अंगार एक फुसका बार निघाला’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांनी लगावला आहे. भाजपाशी उभा दावा मांडल्याचे नाटक करणाऱ्या शिवसेनेने शिवसैनिक आणि मतदारांचीही फसवणूक केली आहे. याचा फटका शिवसेनेला बसल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि युती संदर्भात चर्चा केली. आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख यांनी स्वबळावर लढण्याचे सांगितले होते. तसेच सामनाच्या अग्रलेखातून देखील भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)