शिवसेना-भाजप एकत्र येणे म्हणजे विराेधकांचा पराभव अटळ : उद्धव ठाकरे

अहमदाबाद : शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गुजरात गाठल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपमधील ताणलेले संबंध सार्वत्रीक निवडणुकांच्या तोंडावर अमित शहा यांच्या मध्यस्थीने मिटले आहेत.

सार्वत्रीक निवडणुकांपूर्वी एकमेकांविराेधात उपसलेल्या तलवारी शिवसेना-भाजपकडून आता म्यान करण्यात आल्या असून दोन्ही पक्ष आता यूतीचा एकत्रीत प्रचार करत आहेत. दरम्यान अहमदाबादमध्ये दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज यूतीबाबत गौरव उद्गार काढताना सांगितले की, “शिवसेना-भाजप एकत्र आले आहेत म्हणजे विराेधकांचा पराभव अटळ आहे. मी या ठिकाणी शक्ती प्रर्दशनासाठी आलो नाही, यूती आहे याचा अर्थच आम्ही शक्तीशाली आहोत असा आहे.”

https://twitter.com/ANI/status/1111944317034250240

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)