लोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार !

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांना काही जागा सोडून राहिलेल्या जागा दोन्ही पक्ष समानतेने वाटून घेतील. आणि लोकसभेसाठी शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात आणि देशात आमच्या सरकारने चांगले काम केले असल्याने पुन्हा रालोआच सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही पक्षांत कोणतेही मतभेद नसून व्यापक जनहितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-

गामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि युती संदर्भात चर्चा केली. आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख यांनी स्वबळावर लढण्याचे सांगितले होते. तसेच सामनाच्या अग्रलेखातून देखील भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)