सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक उभारा – नितेश राणे 

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग – अरबी समुद्रात उभारण्यात येणारे शिवस्मारक मालवणातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे करणार आहे, असे ट्विट सिंधुदुर्गचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाला गालबोट लागल्यानंतर राजभवन परिसरात शिवस्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे. परंतु कोकणचे आमदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या मालवण किल्ल्यावर स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान आगामी काळात होणाऱ्या अधिवेशनात ही मागणी आपण लावून धरणार आहे,असेही त्यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)