शिरूरचा अभिलेख व पुरवठा विभाग कोतवालांच्या हाती

शिरूर/सविंदणे – शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा आणि अभिलेख कक्षाचा कारभार कोतवाल चालवत आहे. पुरवठा विभाग आणि अभिलेख कक्ष कोतवालांची नियुक्ती गावातील सजाच्या ठिकाणी असताना शिरूर तहसील कार्यालयाने कोतवाल यांची नियुक्ती अभिलेख कक्ष व पुरवठा विभागात केलेली आहे.

सजाच्या ठिकाणी कोतवाल नसल्यामुळे लोकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. तसेच गावांमध्ये अनेक प्रकारच्या कामांची प्रशासनाला माहिती त्यामुळे वेळेवर भेटत नाही. याच अनुषंगाने मंत्रालय विभागातील महसूलचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी एक परिपत्रक काढले असून त्यामध्ये कोतवालांच्या सेवा वरिष्ठ कार्यालयास संलग्नित न करता संबंधित सजा कार्यालयास त्वरित वर्ग करणेबाबत लेखी सूचना केल्या आहेत. व तसा पत्रव्यवहार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना केला आहे; परंतु अद्यापही कोतवाल शिरूर तहसीलमध्ये विविध विभागात काम करीत आहेत. तसेच तहसील कार्यालयात झिरो व्यक्ती कार्यरत असून बराच कारभार तो “लक्ष्मी’दर्शन घेऊन चालवत आहेत.त्याचप्रमाणे पार्किंगमध्ये अस्ताव्यस्त गाड्या लागल्या असून नागरिकांना जाण्यासाठी त्रास होत आहे. अपंगांना व वृद्ध माणसांना तहसील कार्यालय, कृषी विभाग दुय्यम निबंधक कार्यालय, संजय गांधी निराधार योजना या ठिकाणी जाण्यासाठी लिफ्ट आहे; परंतु ते बऱ्याचदा बंद असल्यामुळे अपंग लोकांना वयस्कर लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. माहिती अधिकारातील माहिती लोकांना वर्षानुवर्षे मिळत नाही. याकडे तहसीलदार लक्ष कधी देणार, असा सवाल येथील सामान्य नागरिकांना पडला आहे.

करंदीचा कोतवाल सांभाळतोय पुरवठा विभाग
करंदी गावातील कोतवाल नवगिरे यांची नियुक्ती तहसीलदार यांनी पुरवठा विभागात केल्यामुळे पुरवठा विभागातील रेशन कार्ड बनवणे वेळेवर होत नाही. गावामध्ये सजाच्या ठिकाणी काम करत असताना नागरिकांकडे पैसे मागणे, चुकीची कामे करणे, अशा प्रकारच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी त्याच्याविरुद्ध होत्या. तसा पत्रव्यवहार त्यांनी शिरूर तहसीलदार यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे केला होता. तरीही त्याच्याकडे पुरवठा विभागातील शिधापत्रिका बनवण्याचे काम सोपवले आहे.

जिल्हाधिकारी, प्रांत यांच्या पत्रव्यवहारामुळे जे कोतवाल तहसील कचेरी, पुरवठा व अभिलेख कक्षात काम करत असतील त्यांना ताबडतोब सजाच्या स्थळी हलवण्यात येईल.
– गुरू बिराजदार, तहसीलदार शिरूर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)