शिरूर लोकसभा: अमोल कोल्हेंच्या विरोधातील आचारसंहिता भंगाची तक्रार निकाली..

शिरूर : अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी नावाच्या मालिकेला सध्या दूरचित्रवाणीवर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली असल्याने त्यांच्या या मालिकेमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

मात्र कोल्हे यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवार घोषित केले असले तरी प्रत्यक्षात कोल्हेंनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही त्यामुळे ते उमेदवार आहेत अशी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत. यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधातील आचारसंहितेचा भंग करीत असल्याबाबतची ही तक्रार काढून टाकण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)