शिरूरमध्ये रामोशी समाजाचा मोर्चा; अनुसूचित जमातीत आरक्षण मिळण्याची मागणी

अनुसूचित जमातीत आरक्षण मिळण्याची मागणी; तहसिलदारांना निवेदन
शिरूर: देशात कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह 10 राज्यांमध्ये रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश आहे. परंतु, महाराष्ट्रात रामोशी समाजाची लोकसंख्या 1.5 कोटी पर्यंत आहे. तरी, तो कायदाच नाही. यामुळे रामोशी समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, यासाठी शिरूर तालुका व शहर जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
शिरूर येथील बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरवात झाली. येथील अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास वंदन करून आरक्षण मोर्चा सुरू झाला. शिरूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तहसीलदार रणजीत भोसले यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात रामोशी व बेरड समाजाची लोकसंख्या जवळपास 50 ते 60 लाख आहे. बेरड रामोशी समाज हा क्रांतीकारी समाज आहे. आद्यक्रांतीकारी राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजा विरुद्ध पहिले बंड केले. ब्रिटीशांना सळो की पळो करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिरजी नाईक यांचेही स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मोलाचे योगदान आहे. आजही महाराष्ट्रातील क्रांतीकारी बेरड, रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिकदुष्ट्‌या मागास असून या जमातीचा अनुसूचित जमातीचा यादीमध्ये समावेश करावा, यासाठी अनेक वर्षापासून समाजातील विविध संघटनांनी आंदोलने, मोर्चे काढले आहेत, निवेदने दिली आहेत. परंतु, राज्य शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.
यावेळी जयमल्हार क्रांती संघटनेचे नेते बबनराव खोमणे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, दौंड तालुकाध्यक्ष बापूसाहेब खोमणे, राज्य महिला संघटक पुजा शितोळे, जिल्हा युवकचे उपाध्यक्ष गोरक्ष खोमणे, जय मल्हार क्रांती संघ तालुकाध्यक्ष महेंद्र बोरडे, शिरूर अध्यक्ष दिनेश चव्हाण, लहुजी शक्तीसेनेचे किरण जाधव, सुधीर खोमणे, विजय जगधने, राजाभाऊ माकर, आबा शितोळे, विजय शितोळे, आंबेगाव तालुकाध्यक्ष नंदू चव्हाण आदी उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)