शिर्डीत आज महिला दहीहंडी

विजेत्यास 1 लाख 11 हजाराचे बक्षीस

शिर्डी – श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षांचे औचित्य साधून श्रीकृष्ण जयंतिनिमित्त शिर्डी शहरात प्रथमच महिला दहीहंडी उत्सव दि. 3 रोजी दु. 4 वा. येथील श्रीरामनगर येथे होत आहे. या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम प्रतिष्ठाण व वसंतदादा मल्टिस्टेट शिर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सोहळ्यात गोरखनाथ महिला दहीहंडी पथक मुंबई हे सहभागी होत असून 1 लाख 11 हजाराचे बक्षीस , सन्मानचिन्ह, चषक विजेत्या पथकास प्रदान करण्यात येणार आहे. परीसरातील महिला दहीहंडी पथकांनी सहभागी होण्याचे आवाहन नगरसेविका अंजली गोंदकर यांनी केले आहे.

शिर्डी शहरात प्रथमच महिलांची पाच थराची दहीहंडी होत असुन सरकारच्या महिला सक्षमीकरण संस्थेअंतर्गत डॉ. राजेंद्र फडके यांच्या सुचनेनुसार बेटी बचाव बेटी पढाव व स्री सक्षमीकरण कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्षा योगीता शेळके ,साईबाबा संस्थानच्या मुख्याधिकारी रुबल अग्रवाल, वसंतदादा मल्टिस्टेटचे चेअरमन मुकूंद शिनगर, हरिहर वारकरी संप्रदाय संघाचे मुंबई अध्यक्ष भाऊ कोरगावकर आदीसह प्रांताधिकारी, तहसीलदार शिर्डी, नगरपंचायत, नगरसेविका, नगरसेवक आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे श्रीराम प्रतिष्ठाणचे संस्थापक रविंद्र गोंदकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)