साई संस्थानचे साडेतीन कोटी गेले पाण्यात

शिर्डी : साईमंदीर परिसरात नव्यानेच बसविण्यात आलेल्या फरशा ब्रेकरने उचकून डागडुजी करताना.

वर्षाच्या आतच फ्लोरिंगच्या कामाची डागडुजी करण्याची नामुष्की; ग्रामस्थांसह साईभक्‍तांकडून नाराजी

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तच्या वतीने साई समाधी शताब्धी सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरातील 1 लाख 7 हजार चौरस फुटामध्ये सुमारे 3 कोटी 50 लाख रुपये खर्च करून फ्लोरिंग करण्यात आले. परंतू वर्षाच्या आत आता या फ्लोरिंगच्या कामाची डागडुजी करण्याची नामुष्की संस्थान प्रशासनावर ओढावली आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांसह साईभक्‍तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

-Ads-

दरम्यान साईबाबा विश्‍वस्तांच्या वतीने साई समाधी शताब्धी वर्षानिमित्त मंदिर परिसरातील फ्लोरिंगचे नुतणीकरणाची कामे करण्यात आली आहे. मात्र एका वर्षाच्या आत गुरूस्थान समोरील नव्याने बसविलेली फ्लोरिंगची तोडफोड करून डागडुजी करण्यात आल्याने साईबाबा संस्थानने ठेकेदाराला दिलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांच्या मनात संशयाची सुई चुकचुकली असल्याच्या चर्चा कानावर ऐकू येत आहे. मागील वर्षी साईमंदिर परिसरातील 3 कोटी 50 लाख खर्चाच्या फ्लोरिंगच्या नुतणीकरणाचा शुभारंभ संस्थानचे अध्यक्ष डॉ.सूरेश हावरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाला होता. पहिल्या टप्प्यात 74 लाख रूपये खर्चाच्या 32 हजार चौरस फुट काम तर दुसऱ्या टप्प्यातील 2 कोटी 75 लाख रुपये खर्चाच्या 75 हजार चौरस फुटाचे काम करण्यात आले होते, मात्र एका वर्षाच्या आतच या साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या फ्लोरिंग कामाचे जोडतोड करण्यात आल्याने संस्थानच्या कारभारावर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

हे फ्लोरिंग बसविताना मंदिर परिसरात भाविकांचा पाय घसरणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली होती. त्या दृष्टीने अत्याधुनिक प्रकारची फरशी बसविण्यात आली आहे, पण याउलट नव्याने बसविण्यात आलेल्या या फरशीवरून आतापर्यंत शेकडो भाविक पाय घसरून पडून जखमी झाल्याचे अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. असे असतांना ही फरशी नेमकी कोणत्या कारणास्तव बसविण्यात आली याचे गूढ मात्र उलगडायला तयार नाही.

अतिशय ढिसाळ प्रशासनाचे ज्वलंत उदाहरण बघायला मिळत आहे. साईभक्तांच्या दक्षिणापोटी मिळणाऱ्या एक एक पैशाचा विनियोग अतिशय व्यवस्थितपणे लावणे क्रमप्राप्त असताना असला ढिसाळ कारभारामुळे साईसंस्थानची प्रतिमा मलिन होत आहे. साईसमाधी शताब्दी वर्षांमध्ये फक्त मंदिर परिसरामध्ये फरशी बसवण्याचं एकमेव काम संस्थानकडून झाले आणि अवघ्या वर्षभरात ही फरशी बदलवण्याची वेळ संस्थानवर आली. याला दोषी कोण समजावे? भक्तांनी श्रद्धेपोटी दिलेल्या दानाचा सदुपयोग व्हावा एवढीच माफक अपेक्षा.
-निलेश कोते, माजी उपनगराध्यक्ष


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)