शिर्डी संस्थानच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार थकले

शिर्डी - साई संस्थानाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार थकविल्याने शिवप्रहार संघटनेचे चौगुले यांनी अधिकाऱ्यांसह स्वत:ला कोंडले.

शिवप्रहारच्या चौगुले यांनी अधिकाऱ्यांना कोंडले

शिर्डी – साईबाबा संस्थानने नेमलेल्या एम.पी.कंपनीने सुमारे 1 हजार 700 स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर मागील दोन महिन्यांचे पगार थकविल्याने कामगारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, थकीत पगारांबाबत एम. पी. कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास गेलेल्या शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी अधिकाऱ्यांसह स्वतःला कार्यालयात कोंडून घेतले.

-Ads-

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत साई समाधी शताब्धी वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी खिरापतीसारखा दिला जात आहेत. त्याचबरोबर साई समाधी शताब्धी सोहळ्याची सांगता समारोपासाठी करोडो रुपये खर्चून एकीकडे जय्यत तयारी सुरु आहे तर दुसरीकडे साईबाबा संस्थानच्या कंत्राटीपद्धतीने घेतलेल्या स्वच्छाता विभागाच्या सुमारे 1 हजार 700 कर्मचाऱ्यांचे पगार ठेकेदाराने थकविल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. चौगुले यांनी आज शिर्डी येथील एम.पी.कंपनीच्या कार्यालयात जावून स्वतः सह अधिकाऱ्यांना कोंडून घेऊन कामगारांच्या पगाराविषयी विचारणा केली.

दुसऱ्याकडे बोट दाखवीत वेळ मारून नेत असल्याचे सांगून साईबाबा संस्थानने अजून बिल केलेले नाही. त्यामुळे कामगारांचे पगार करू शकत नाही. अशी उडवा-उडवीचे उत्तर दिली. दरम्यान ठेकेदार आणि साईबाबा संस्थानच्या झालेल्या करारानुसार ठेकेदाराने अगोदर कर्मचाऱ्यांचे पगार करून तसेच पी.एफ.भरून संस्थानच्या कार्यालयात पावत्या जमा करणे बंधनकारक असतांना त्यानंतर संस्थांन पेमेंट ठेकेदाराच्या खात्यावर जमा करणार अशी तरतूद आहे, मात्र एम.पी. कंपनीचा ठेकेदार साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांवर पगाराबाबतचे खापर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये सर्व सामान्य कामगार भरडला जात आहे.

दरम्यान या ठेकेदाराने आजपर्यंत कधीही वेळेवर पगार दिलेला नसून प्रत्येकवेळी पगारासाठी संघर्ष करण्याची वेळ आल्याची कर्मचाऱ्यांनी सांगितले. ठेकेदाराच्या कंपनीवर कराराचा अटीशर्थी भंग केल्याने संबधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याचा मोबदला जर आंदोलन करून भिकाऱ्यासारखा माघावा लागत असेल तर या सारखे दुर्दैव नसल्याची खंत व्यक्त केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)