हिटलरसुद्धा मोदींप्रमाणे वागला नसेल : सुशीलकुमार शिंदे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी झोडपून काढल्याबाबत आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मोदींचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला.

यावेळी बोलताना शिंदे यांनी मोदींची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलरशी करताना, “भाजप आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकशाहीमध्ये सर्वांनाच निदर्शने करण्याचा हक्क आहे. मात्र मोदींच्या काळामध्ये या हक्कावर जाणूनबुजून गदा आणली जात असल्याने देशात लोकशाही आहे का हुकूमशाही असा प्रश्न निर्माण होतो. हिटलर सुद्धा अशाप्रकारे वागला नसेल.” असे वक्तव्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेकवेळा आंदोलने केली आहेत मात्र ही पहिलीच वेळ होती जेव्हा पोलिसांनी आम्हाला बाळाचा वापर करून आंदोलन करण्यापासून रोखले. मोदी हे रशियन पंतप्रधान व्लादिमिर पुतीन यांच्याप्रमाणे विरोधकांची गळचेपी करीत आहेत.” असे आरोप देखील त्यांनी मोदींवर लावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)