दीपिकाच्या विजयामुळे शिल्पा शिंदेचा जळफळाट

साडे तीन महिने चाललेल्या “बिग बॉस 12’मध्ये दीपिका कक्कड विजयी झाली आणि तिच्या फॅन्स आणि फ्रेंडसनी आनंद व्यक्‍त केला. तर श्रीसंत, दीपक ठाकूर आदींनी निराशा व्यक्‍त केली. त्यांची निराशा स्वाभाविक होती. पण गेल्या सीझनची विजेती शिल्पा शिंदेचा मात्र जळफळाट झाला. तिने सोशल मिडीयावर आपला राग, निराशा आणि उद्‌वेग व्यक्‍त केला आहे. तिने दीपिकाला खूप नावे ठेवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एवढेच नव्हे तर ती दीपिकाला उद्देशून चक्क “मख्खी’ म्हणाली. “आजकाल सर्वच प्रॉडक्‍ट भेसळयुक्त झाली आहेत. शो देखील भेसळीचे प्रॉडक्‍ट प्रोड्युस करायला लागले आहेत. एक माशी संपूर्ण शो भर भुणभुण करत राहिली आणि अखेर माशीच जिंकली. म्हणून तर ट्रॉफी पण तुटली.’ असे शिल्पा शिंदे म्हणाली. तिने दीपिकाचे नाव घेतले नाही. मात्र तिचा रोख कोणाकडे होता, हे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर शो दरम्यान दीपिकाला रडू आले होते. शिल्पाने त्या इमोशनल होण्याचीही चेष्ठा केली. तिच्यामते दीपिकाला जिंकवणे म्हणजे भेदभाव केल्यासारखे आहे. शिल्पाने पहिल्यापासूनच श्रीसंतला पाठिंबा दिला होता. पण तिच्या या ट्रोलिंगला प्रेक्षकांनीच उत्तर दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)