शिल्पाने सांगितले सलमान खानला डेट करण्याचे रहस्य 

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि हॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दस, गर्व, औजार, फिर मिलेंगे, शादी करके फंस गय यार यासारख्या चित्रपटात एकत्रित काम केलेले आहे. या दोन्ही कलाकारांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधही आहेत. काही वर्षांपूर्वी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. तेव्हा त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, काही वर्षानंतर आता शिल्पा शेट्टीने यावर दिलखुलासपणे सांगितले.
“डेक्‍कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, सलमान खान हा माझ्या घरी कधीही रात्री-अपरात्री येत असत. जेव्हा मी झोपलेली असत. तेव्हा तो माझ्या वडीलांसोबत एक किंवा दोन ड्रिंक घेत असत. मात्र, आम्ही दोघे कधी डेटवर गेलो नाही. त्या दिवसांमध्ये कलाकारांमध्ये खूपच चांगले संबंध असत.
शिल्पाने असेही सांगितले की, सलमान खूपच शांत, काळजी घेणारा आणि “डाउन टू अर्थ’ असा व्यक्‍ती आहे. मला आठवते जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा सलमान माझ्या घरी आला होता. तो सरळ बार टेबलवर गेला आणि तेथेच तो रडू लागला. दरम्यान, 22 नोव्हेंबर 2009ला शिल्पाने राज सोबत लग्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)