दिल्ली काँग्रेसची कमान ८० वर्षीय शीला दीक्षितांकडे

नवी दिल्ली : दिल्ली प्रदेश अध्यक्ष अजय माकन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माकन यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांची जबाबदारी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा जेष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्याकडे आज दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांना केवळ ३ महिने बाकी असताना ८० वर्षीय शिला दीक्षित यांच्यावर आता दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पुनरुत्थानाचे अवघड आव्हान असणार आहे. शीला दीक्षित यांच्यावर फ्रांसमध्ये नुकतीच एक सर्जरी देखील करण्यात आली होती. आपणास अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास आपण ती सार्थपणे पार पाडू असा विश्वास त्यांनी पक्षाला दिल्यानंतरच त्यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

माजी प्रदेश अध्यक्ष अजय माकन यांनी शीला दीक्षित यांची दिल्ली प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे ट्विटरद्वारे अभिनंदन केले आहे. तसेच दीक्षित दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि भाजपचा बिमोड करण्यात यशस्वी होतील अशी आशा देखील व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)