शेवगावात खरेदी केंद्राची नियुक्ती

संग्रहित छायाचित्र

31 आॅक्टोबरपर्यंत नोंदणी

मूग 6175 रू, उडीद 5600 रू. प्रतिक्‍विंटल आधारभूत दर असून, दि. 25 सप्टेंबर ते दि. 9 ऑक्‍टोबरपर्यंत तर, सोयाबीन 3399 रू. आधारभूत भाव आहे. त्यासाठी 1 ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

शेवगाव – खरीप हंगाम 2018-19 मध्ये नाफेडतर्फे उडीद, सोयाबीन व मुगाच्या किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जगदंबा महिला ग्रामीण सहकारी संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या खरेदी केंद्राची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 3) पासून या संस्थेकडे ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्‍यातील शेतकऱ्यांची येथे नोंद घेतली जात आहे.

संस्थेच्या सचिव लक्ष्मी विघ्ने यांनी यासंदर्भात ज्या तालुक्‍यात शेतजमीन आहे, त्याच तालुक्‍यात ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याचे सांगितले. बॅंक खात्याशी लिंक असणारे आधार कार्डची प्रत, संबंधीत पिकाची नोंद असणारा 7/12 उतारा जोडावा. नोंदणी केल्यानंतर क्रमवारीनुसार माल आणण्यासठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. माल घालतांना इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर वजन करून, काटा पावती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर संबंधीत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे वर्ग होतील असे सांगितले. मुदतीच्या आत आपल्या मालाची ऑनलाईन नोंदणी करावी असे अवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)