शेवगाव बसस्थानकांसाठी पावणेपाच कोटींचा निधी…

संग्रहित छायाचित्र

आमदार मोनिका राजळे : व्यवस्थापकीय संचालकाकडून कामांना प्रशासकीय मंजुरी

शेवगाव – शेवगाव येथील बसस्थानकाचे नवीन बांधकामासाठी 3 कोटी 27 लक्ष रुपयांचा तर, पाथर्डी येथील जुन्या बसस्थानकाच्या पूनर्बांधणीसाठी 1 कोटी 51 लक्ष रुपयांचा निधी असा एकूण 4 कोटी 78 लाख रुपयाचा भरीव निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता, या रास्त मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक यांनी सदर कामांना प्रशासकीय मंजुरी नुकतीच दिली आहे.
शेवगाव शहराचे मध्यवर्ती ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या मालकीची मोठ्या प्रमाणावर जागा आहे. हे जिल्हयातील सर्वात जुने आगार असूनही येथे अद्याप अद्ययावत बसस्थानक होऊ शकले नाही, तसेच वाहनतळ खराब झाल्याने त्यावर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने बसस्थानकाची दुरावस्था झाली होती.

प्रवाशांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत, येथील बसस्थानकाचे बांधकाम होण्यासाठी प्रवाशी संघटना, नागरिक यांची मोठी मागणी होती. शेवगाव हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. गेवराई, पैठण, अंबेजोगाई, अंबड, जालना, माजलगाव येथून पुणे, मुंबई, नगरला जाणाऱ्या बहूतेक बसेस शेवगाव आगारमार्गे जातात, त्यामुळे येथे प्रवाश्‍यांची दिवसरात्र वर्दळ असते. हे विचारात घेऊन या बसस्थानक इमारतीचे बांधकाम, सांडपाणी व पाणी पुरवठा व्यवस्था, वाहनतळावर भराविकरण व डांबरीकरण, लॅंडस्केपिंग, विद्युत व्यवस्था या कामासाठी 3 कोटी 27 लक्ष 51 हजार रुपयांचे कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

पाथर्डी तालुक्‍यातील क्षेत्र मोहटा देवी, कानिफनाथ देवस्थान, भगवानगड येथील भाविक तसेच तालुक्‍यातील बहुसंख्य प्रवाशी पाथर्डीच्या जुन्या बसस्थानकातून प्रवास करतात. येथेही दिवसभर प्रवाश्‍यांची गर्दी असते, मात्र, धूळ तसेच खराब झालेले वाहनतळ, यामुळे प्रवासाची मोठी हेळसांड होत असल्याने या स्थानकाच्या दुरुस्तीची गरज होती.

याकरिता येथील इमारतीचेही बांधकाम, सांडपाणी व पाणी पुरवठा व्यवस्था, भराविकरण व डांबरीकरण, लॅंडस्केपिंग, विद्युत व्यवस्था या कामासाठी 1 कोटी 51 लक्ष 24 हजार रुपयांचे कामांना मंजुरी मिळाली आहे. पाथर्डी व शेवगाव येथील बस्थानकाची पुनर्बांधणी व्हावी अशी प्रवाशी संघटना, नागरिकांची जुनी मागणी होती, सदर कामाला आता निधी उपलब्ध झाल्याने, त्यांनी आमदार मोनिका राजळे यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)