शिरूरमधील जिल्हा परिषद सदस्यावर सावकारकीचा गुन्हा 

राजेंद्र जगदाळे व अन्य तिघांविरोधात शिरूर पोलिसांत तक्रार 

शिरूर (प्रतिनिधी) -कर्डे (ता. शिरूर) सावकारकीचा पैशांवरून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभुल लुंकड, शशांक लुकंड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र रणजीत जगदाळे अशी गुन्हा दाखल झोलल्यांची नावे आहेत. या तिघांचा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक रामदास पाचर्णे (रा. कर्डे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पाचर्णे हे रांजणगाव एमआयडीसीत नोकरीला आहेत. त्यांचे बंधू सुधीर यांनी दीपक यांना घर बांधण्यासाठी सन 2016मध्ये गावातील खासगी सावकार प्रभुल लुंकड यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्यावेळी 10 रुपये टक्के दरमहा व्याजदराने पैसे देतो, असे सांगून त्या मोबदलात पाचर्णे यांच्याकडील जमीन घेतली. जुलै 2016मध्ये पहिल्या टप्प्यात चार लाख रुपये व डिसेंबर 2016मध्ये दुसऱ्या टप्प्यात 3 लाख रुपये दीपक पाचर्णे यांनी प्रभुल लुकंड यांच्याकडून आणले होती. पाचर्णे यांनी सर्वे नंबर 248 मधील 11 लाख्र रुपये किंमतीची 20 गुंठे जमीन खरेदीखताने नावावर करून दिली होती. शशांक यांचा नावाने या जमिनीचे खरेदीखत करण्यात आले होते. या पैशांचे 6 लाख रुपये इतके व्याज त्यांनी दिले असून, जमिनीचा ताबा पाचर्णे यांच्याकडे आहे. आर्थिक अडचणींमुळे पाचर्णे यांना पैसे देता येत नव्हते. शशांक यांनी हे पैसे राजेंद्र रणजीत जगदाळे यांच्याकडून घेऊन दिल्याचे पाचर्णे यांना शशांक लुकंड यांनी सांगितले.

20 जून 2019 रोजी प्रभुल लुकंड, शशांक प्रभुल लुंकड, राजेंद्र रणजीत जगदाळे हे पाचर्णे यांच्या घरी आले. व्याज व मुद्दल मिळून 17 लाख रुपये देऊन टाका आणि खरेदीखत उलटून घ्या, असे सांगत आठ दिवसांचा आत व्यवहार पूर्ण केला नाही तर जेथून असेल तेथून उचलून घेऊन जाण्याची धमकी पाचर्णे यांना दिल्याचे फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे. 27 जून 2019ला पुन्हा धमकी दिल्यामुळे लुंकड आणि जगदाळे यांच्या भीतीपोटी ते घरातून निघून गेले होते. पाचर्णे यांच्या घरामध्ये पैशांच्या कारणावरून भांडणे सुरु झाली होती.

या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न पाचर्णे यांनी केल्याचे सांगत 15 जून 2019ला लुंकड व जगदाळे या तिघांनी सावकारी पैशांवरून मारहाण व शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात पोलीस हवालदार खोमणे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान या तिघांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)