‘या’ वक्तव्यानंतर शीला दीक्षित यांचा घुमजाव ; काँग्रेसमध्ये चर्चेला उधाण

‘दहशतवादाविरुद्ध मनमोहन सिंग सरकार पेक्षा मोदी सरकार गंभीर’

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीला दीक्षित यांनी मोठे वक्तव्य केले आहे.  त्या म्हणाल्या ‘दहशतवादाविरुद्ध मनमोहन सिंग सरकार पेक्षा मोदी सरकार गंभीर आहे’ त्यानंतर शीला दीक्षित यांनी ट्विट करत या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

-Ads-

त्या म्हणाल्या ” काही वृत्तसंस्था त्यांच्या वक्तव्याला मोडून दाखवत आहेत. मी असे म्हटले काही लोकांना वाटू शकते नरेंद्र मोदी दहशतवादाविरुद्ध कडक आहेत. मात्र तो फक्त चुनावी जुमला आहे, त्यापेक्षा काही नाही. राष्ट्रीय सुरक्षा चिंतेचा विषय असून इंदिरा गांधी याबाबत गंभीर होत्या.

काय म्हणाल्या होत्या शीला दीक्षित ?

पुलावमा हल्ल्यानंतर मोदींचे उत्तर जास्त प्रभावी आणि सरस होते. मात्र मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा २६/११ च्या हल्ल्यानंतर इतके प्रभावी उत्तर देऊ शकले नाहीत असे म्हटले आहे. मात्र वायुसेनेने केलेल्या कारवाईचे राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत अशी टीकाही शीला दीक्षित यांनी केली.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)