दहशतवाद्यांना बांगला देशाच्या भूमीचा वापर करू देणार नाही – शेख हसीना

ढाका (बांगला देश) – दहशतवाद्यांना बांगला देशाच्या भूमीचा वापर करू देणार नाही असे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे. व्हिडियो कॉन्फरन्सिंगने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बांगला देशातील चार प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांना असे आश्‍वासन दिले आहे.

द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि बहुपक्षीय सहकार्याने दक्षिण एशियातील दहशतवादाचा समूळ उच्चाटन करण्याच्या संकल्पाचा त्यांनी या प्रसंगी पुनरुच्चार केला. गेल्या महिन्यात काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी तीव्र सहानुभूती व्यक्‍त केली.

शेजारी देश म्हणून भारत आणि बांगला देश यांच्यात असलेले संबंध साऱ्या जगासाठी आदर्श असल्याचे सांगून शेख हसीना यांनी पुढे सांगितले की, दोन्ही देशांमध्ये बहुआयामी सहकार्य आहे. हे सहकार्य असेच कायम राहील असा दृढ विश्‍वास त्यांनी या प्रसंगी बोलून दाखवला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)