नकाब घातल्याने तिला बसला जवळजवळ १०,००० रुपये दंड 

डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर ओढण्याचे नाकाब किंवा हिजाब वर १ ऑगस्ट पासून बंदी आली. त्यानंतर या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एका महिलेला त्यासाठीचा दंड देखील बसला आहे.

तेथील पोलीस अधिकारी डेव्हिड बोर्केर्सन यांनी  रितजाऊ न्यूज एजेंसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,आम्हाला होरशोल्म येथील शॉपिंग सेंटरमध्ये बोलवण्यात आले. येथे काल  एका महिलेने दुसऱ्या महिलेचा नकाब फाडण्याचा प्रयन्त केला होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले.
बोर्केर्सन म्हणाले, “भांडण चालू असताना त्या महिलेचा नकाब निघाला  परंतु जोपर्यंत आम्ही पोहचणार तोपर्यंत तिने नकाब पुन्ह घातला होता. “
पोलिसांनी नकाब घालणाऱ्या महिलेचा फोटो काढला आणि शॉपिंग सेंटरच्या सेक्युरिटी कॅमेऱ्यात त्याचे फुटेज पहिले. त्यानंतर तिच्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १,००० क्रॉनर म्हणजे भारतीय चालनामध्ये जवळजवळ १०,००० रुपये दंड ठोठावला आहे.
त्यानंतर तिला सार्वजनिक स्थानावरून जाण्यास किंवा नकाब काढण्यास सांगितले असता तिने सार्वजनिक स्थानावरून जाणे पसंत केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)