गुवाहाटीच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये शानवर फेकला पेपर बॉल

आसाम – गुवाहाटी येथे सरूसजाई स्टेडियममध्ये म्युसिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायक शानने म्युसिक कॉन्सर्टमध्ये अनेक गाणी गायली. मात्र बंगाली गाणे गायला सुरुवात केली असता गर्दीतील प्रेक्षकांमधून या अज्ञात इसमाने पेपर बॉल स्टेजवर फेकून मारण्याची घटना घडली. या घटनेमुळे शान प्रचंड संतापला होता. तसेच या घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

दरम्यान शान संताप व्यक्त करत बोलला, ”कलाकाराचा आदर करायला शिका, यानंतर कधीच कलाकारांवर वस्तू फेकू नका, मी काल आजारी होतो, औषधे घेऊन स्टेजवर आलो आहे.तुमच्यासमोर मी आज रात्रभर गाणार आहे. जर प्रेक्षक असा प्रकार करणार असेल,तर मला गाण्यात काहीही रस नाही, असेही तो म्हणाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शानने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. प्यार में कभी कभी, फना, कभी अलविदा ना कहना, मस्ती, वेलकम, तारे जमीं पर अशा अनेक चित्रपटांसाठी तो गायला आहे.याशिवाय अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही तो दिसला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)