शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांचा समाजवादी पक्षात प्रवेश

नवी दिल्ली – शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी डिंपल यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

लखनऊ लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राजनाथ सिंह यांच्याविरोधात पूनम सिन्हा या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार समाजवादी आणि बसपा यांच्या आघाडीकडून पूनम सिन्हा यांना तिकिट मिळू शकते. तर काँग्रेस पक्षाचे सुध्दा लखनऊ येथून जोरदार प्रयत्न सुरू असून राजनाथ सिंह यांच्या विरोधात जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

लखनऊ येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल आहे, तर मतदान 6 मे रोजी होणार आहे. याठिकाणी सपा पक्षाने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता सर्वाचेंच लक्ष्य लखनऊकडे लागले आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1118091817877065728

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)