अनेक गोष्टी करूनही माझे नाव मी टू प्रकरणात आले नाही – शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सुदैवाने माझे नाव मी टू या प्रकरणात आले नाही. मी आतापर्यंत अनेक गोष्टी केल्या. परंतु माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाही, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले आहे. ते मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हंटले कि, एका यशस्वी माणसाच्या बदनामी मागे एका महिलेचा हात असतो. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मी या मोहिमेची खाल्ली उडवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माझ्या या वक्तव्याचा विपर्यास करू नये. माझे वक्तव्य मस्करीत घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, मी स्वतःला भाग्यवान समजतो कि माझे नाव मी टू या प्रकरणात आले नाही. मी माझ्या पत्नीचे नेहमीच ऐकतो ती माझी सुरक्षाकवच आहे, असे ते म्हणाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)