शत्रुघ्न सिन्हा यांची कमळाला सोडचिठ्ठी

पाटणा – भारतीय जनता पक्षात असलेले शत्रुघ्न सिन्हा २८ मार्चला काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.काँग्रेसचे वरिष्ठ नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. सिन्हा यांना काँग्रेस पाटणा साहेब येथून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

भारतीय जनता पक्षाने यावेळेस रवी शंकर प्रसाद यांना पाटणा साहेब येथून उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेस पक्षाचा हात धरण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती.

त्यातच गेल्या काही दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा आपल्या ट्विटर खात्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या समर्थनात ट्विट करत होते. त्यामुळे या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

https://twitter.com/ShatruganSinha/status/1110402074645356544

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)