पाटणा साहिमधून शत्रुघ्न सिन्हांचा उमेदवारी अर्ज दाखल

पाटणा साहिब – २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बिहारमधील पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून विजय संपादित केलेले बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यंदा याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने पाटणा साहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी औपचारिकरीत्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासूनच शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण पाटणा साहिबमधूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर काँग्रेसने देखील सिन्हा यांना पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येत असल्याचे घोषित करत यंदा पाटणा साहिबमधून दोन दिग्ग्ज नेत्यांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

पाटणा साहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते रविशंकर प्रसाद हे निवडणुकीच्या रिंगणात असून आता आज शत्रुघ्न सिन्हा यांच्यातर्फे देखील उमेदवारी दाखल करण्यात आली असल्याने यंदा पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघामध्ये हाय प्रोफाइल लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.    .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)