नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाने लोकसभा2019 निवडणुकीसाठी आणखी एक उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये बिहार, हिमाचल प्रदेश आणि पंजाब येथील एकूण 5 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारमधील पटणा साहिब येथून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून पटणा साहिब येथे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पटणा साहिब येथे शत्रुघ्न सिन्हा विरूध्द रविशंकर प्रसाद अशी लढत होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वाचेंच लक्ष लागले आहे.
Congress releases another list of 5 candidates for #LokSabhaElections2019 pic.twitter.com/6MbmEfXLkX
— ANI (@ANI) April 6, 2019
दरम्यान, आजच शत्रुघ्न सिन्हा यांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सिन्हा हे भाजपाच्या तिकिटावर पटना साहिब येथूनच विजयी झाले होते.