फक्‍त प्रचाराच्या जोरावर मोदी पंतप्रधान : शत्रुघ्न सिन्हा 

 कामगिरी समाधानकारक नाही; मोदींनी चहा कधीच विकला नसल्याची जास्त शक्‍यता

तिरुवनंतपुरम – भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदींनी ते फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले अशी टीका पुन्हा केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की, तुम्ही कलाकार आहात, तुम्हाला नोटाबंदी आणि जीएसटीमधले काय कळते? असे मला अनेक लोक विचारतात. वकील जर अनुभव नसताना आर्थिक मुद्द्यांवर बोलतो, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री टीव्हीवरची कलाकार होते, एक चहा विकणारा माणूस, अर्थात मोदींनी कधीही चहा विकलाच नाही, फक्‍त मीडियाच्या जोरावर आणि प्रचारावर मोदी पंतप्रधान झाले. जर ते काहीही बोलू शकतात तर नोटाबंदी किंवा जीएसटी या मुद्द्यांवर मी का बोलू शकत नाही? असाही प्रश्न सिन्हा यांनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदींशी माझे व्यक्तिगत शत्रुत्व नाही. पण मी वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीला कंटाळलो असल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. एखादा पक्ष कोणत्याही लोकशाही देशात एखाद्या माणसामुळे मोठा होतो. पण मोदींनी देश हा पक्षापेक्षा मोठा असतो हे विसरू नये, असे ते म्हणाले.

तिरुवनंतपुरम या ठिकाणी कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी ही टीका त्याच कार्यक्रमात केली आहे. त्यांनी असाही दावा केला की, मोदी यांनी कधीही चहा विकला नसल्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)