सीव्हीसी बजावणार वर्मा , अस्थानांना समन्स? 

नवी दिल्ली – सीबीआयमधील अंतर्गत संघर्ष उफाळून येऊन त्या संस्थेचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी थेट संस्थेचे प्रमुख असणारे संचालक अलोक वर्मा यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दिली. त्या तक्रारीवरून केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी सुरू केली आहे.

त्या चौकशीसंदर्भात प्रसंगी वर्मा आणि अस्थाना यांना बोलावले जाण्याची शक्‍यता असल्याचे संकेत खुद्द सीव्हीसीचे प्रमुख के.व्ही.चौधरी यांनी बुधवारी दिले. सीबीआय तपास करत असलेल्या काही प्रकरणांत वर्मांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांकडे सीव्हीसीने मंगळवारी चौकशी केली. त्या बहुतांश प्रकरणांच्या फाईल्स सीव्हीसीला मिळाल्या आहेत. त्यामुळे सीव्हीसीच्या चौकशीला आणखी गती मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)