पाकचे माजी पंतप्रधान शरीफ यांची प्रकृती गंभीर

लाहोर: पाकिस्तानचे कारागृहात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली आहे. त्यांच्या हदयाच्या कार्यामध्ये मोठी गुंतागुत निर्माण झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

69 वर्षीय शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ते सध्या लाहोरच्या कारागृहात आहेत. त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना कोटलाखपत येथील कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यानंतर आज त्यांना परत कारागृहात हलवण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारागृहाच्या डॉक्‍टरांनी शरीफ यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे पण त्यांच्या व्यक्तीगत डॉक्‍टरांनी मात्र शरीफ यांच्या प्रकृती विषयी रूग्णालयातील डॉक्‍टरांना नेमके निदान झालेले नाही असे म्हटले आहे. त्यांची कन्या मरियम यांनी वडिलांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्‍त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की आपल्या वडिलांच्या प्रकृतीविषयीची माहिती केवळ माध्यमांमधूनच समजते आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही असेही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. देशाच्या माजी पंतप्रधानांना सरकारने जास्तीतजास्त चांगली ट्रीटमेंट दिली पाहिजे अशी मागणी त्यांचे बंधु शाहबाज शरीफ यांनी सरकारकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)