लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना वैद्यकीय कारणासाठी देण्यात आलेली सहा आठवड्यांच्या जामीनाची मुदत संपल्याने त्यांना आता पुन्हा तुरूंगात परतावे लागणार आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. ते सायंकाळी कारागृह अधिकाऱ्यांपुढे शरणांगती पत्करून पुन्हा कारागृहात परत जातील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
69 वर्षीय शरीफ यांना 26 मार्च रोजी सहा आठवड्यांचा अंतरीम जामीन मंजुर करण्यात आला होता. आपल्याला असलेल्या गंभीर आजारांमुळे आपल्याला कायम स्वरूपी जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांनी कोर्टाला 27 एप्रिल रोजी केली होती पण त्यांच्या या अर्जावर अजून निर्णय झालेला नाहीं. अंतरीम जामीन वाढवून मिळावा अशी त्यांनी केलेली मागणीही कोर्टाने फेटाळून लावली आहे.