शेअर बाजारात नफेखोरी चालूच

टीसीएस कंपनीचा शेअर कोसळला 2.45 टक्‍क्‍यांनी

मुंबई – शुक्रवारी सकाळी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. मात्र नंतर बड्या माहिती तंत्रज्ञान कंपन्याचे शेअर घसरल्यामुळे विक्री वाढली आणि निर्देशांक कालच्या तुलनेत कमी पातळीवर बंद झाले. शुक्रवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 96 अंकानी म्हणजे 0.27 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 36009 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 26 अंकानी कमी होऊन 10794 अंकावर बंद झाला. मात्र आठवड्याच्या पातळीवर सेन्सेक्‍स 314 अंकानी तर निफ्टी 67 अंकानी वाढला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काल टिसीएस कंपनीने नफ्यात 24 टक्‍के वाढ झाल्याचे जाहीर करुनही या कंपनीच्या शेअरचर भाव आज दिवसभरात 2.45 टक्‍क्‍यांनी कमी झाला. त्यामुळे निर्देशांकांवर दबाव आल्याचे वातावरण होते. त्यातच आजही रुपयाच्या मूल्यात घट होण्याची लक्षणे दिसून आल्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्री केली असे ब्रोकर्सनी सांगितले.

गेल्या काही दिवसात क्रुडचे दर बरेच कमी झाले होते. त्यामुळे तेल उत्पादकांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात कपात सुरू केली असल्यामुळे क्रुडचे दर आता दिवसोंदिवस वाढू लागले आहेत. ती भारताच्या दृष्टीने डोके दुखी ठरण्याची शक्‍यता आहे. आता क्रुडचे दर 60 डॉलरच्या वर गेले आहेत. त्या दराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहण्याची शक्‍यता आहे.

काल झालेल्या व्यवहारानुसार परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 344 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 10 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. आज झालेल्या विक्रीचा फटका इंटस्‌इंड बॅंक, टाटा मोटर्स, टीसीएस, येस बॅंक आणि एलऍण्डटी या कंपन्यांना बसला. या कंपन्यांच्या शेअरच्या भावात 3.26 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. तर आयटीसी, ऍक्‍सिस बॅंकेचे शेअर वधारले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)