शेअरबाजार आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून पुढील दीड महिना अग्निपरीक्षेचा राहणार 

चालू आर्थिक वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 17664 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हे गुंतवणूकदार शेअरबाजाराबरोबरच रोखे बाजारातूनही अंग काढून घेत आहे. पुढील सहा आठवड्यांत शेअरबाजारातील अनिश्‍चितता आणखी वाढणार असल्यामुळे निफ्टी 9900 या पातळीपर्यंत खाली जाऊ शकतो, असे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार एकतर विक्री करतील किंवा कुंपणावर बसून राहतील. 
ए. के. प्रभाकर, संशोधन प्रमुख, आयडीबीआय कॅपिटल 
काही राज्यांतील निवडणुका आणि व्यापारयुद्धाचा परिणाम 
मुंबई: कामकाजाच्या केवळ 25 दिवसांत मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 4600 अंकांनी कोसळला आहे. ज्या कारणामुळे निर्देशांक इतक्‍या कमी वेळेत इतक्‍या मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे, ती कारणे तशीच आहेत. उलट त्या कारणात आगामी काळात काही प्रमाणात भर पडणार आहे. त्यामुळे शेअरबाजार निर्देशांकांना आगामी सहा आठवड्यात अनेक अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
गेल्या 25 दिवसांत शेअरबाजार निर्देशांक कोसळले कारण म्हणजे क्रुडचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर चालू खात्यावरील तूट वाढल्यामुळे रुपयाचा दर कमी होत आहे. अमेरिकेने अनेक देशांबरोबर व्यापारयुद्ध सुरू केले आहे. आगामी काळात या कारणात काही फरक पडणार नाही. उलट त्यात भर पडणार आहे.
त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे काही राज्यात निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर या राज्याच्या निवडणुका संपल्यानंतर संसदेच्या निवडणुकाचे वारे वाहणार आहेत. अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी तीन आठवड्यात सुरू होणार आहे. भारताने अमेरिकेचा विरोध झुगारून इराणकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय अमेरिकेतील संसदेच्या निम्म्या जागासाठी काही आठवड्यात मतदान होणार आहे.
त्याचबरोबर अमेरिकेच्या व्याजदरवाढीची टांगती तलवार शेअरबाजारावर कायम असणार आहे. या कारणामुळे आता परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना गृहीत धरण्याचे दिवस गेले आहेत. त्या प्रमाणात निर्देशांकांत घट होण्याची शक्‍यता अधिक असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. शेअरबाजार आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून पुढील दीड महिना अग्निपरीक्षेचा राहणार असल्याचे ब्रोकर्सने सांगितले. याची जाणीव रिझर्व्ह बॅंकेला आहे.
त्यामुळे महागाई वाढण्याची शक्‍यता असूनही रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी पतधोरणात रेपो दर 6.50 या पातळीवर स्थिर ठेवला. भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेची परिस्थिती खराब असतनाच आता काही राज्यांत निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे आर्थिक स्थितीकडे केंद्र किंवा राज्यसरकार लक्ष देऊ शकणार नाही. त्याचबरोबर आचारसंहितेमुळे आर्थिक निर्णय घेण्यात अडचणी येणार आहेत. या सर्वंचा परिणाम निर्देशांकावर होणार आहे. डॉलरमधील गुंतवणूक अधिक नफादायक होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत आहेत. आगामी काळातही या परिस्थितीत कसलाही फरक पडणार नसल्याचे अनेक ब्रोकर्सनी सांगितले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)