निवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांकांत सुधारणा

मुंबई – गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या पडझडीमुळे कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात बरीच निवडक खरेदी होऊन निर्देशांकांत वाढ झाली. आज झालेल्या खरेदीचा फायदा दूरसंचार,धातू, वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांना झाला. या कंपन्याचे शेअर आज 2 टक्‍क्‍यापर्यंत वाढले. सरकारी बॅंकाच्या शेअरच्या भावात 4 टक्‍क्‍यापर्यंत वाढ झाली.

सकाळी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 350 अंकापर्यंत वाढला होता. रुपयाच्या मूल्यातही आज वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना थोडा धीर आला. बाजार बंद होण्याच्या अगोदर झलेल्या नफेखारीमुळे सेन्सेक्‍सला ती पातळी राखता आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तरीही कालच्या तुलनेत आज सेन्सेक्‍स 181 अंकानी म्हणजे 0.51 टक्‍क्‍यांनी वाढून 35695 अंकावर बंद झाला. तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 55 अंकानी वाढून 10727 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले.

मात्र आठवड्याच्या पातळीवर सेन्सेक्‍स 381 अंकांनी तर निफ्टी 132 अंकांनी कमी झाला. जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण आहे. त्याचबरोबर भारतात निवडणुकावरून वातावरण तापले असल्यामुळे गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)