जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश

शेअरबाजार निर्देशांकांचे कोसळणे चालूच

जेट एअरवेजचे शेअर 6 टक्‍क्‍यांनी घसरले

आर्थिक अडचणीत असलेल्या जेट एअरवेजला शेअरबाजारातून बराच फटका बसत आहे. कंपनीने सरकारी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता चुकविल्यानंतर काल जेट एअरवेजचे शेअर 3 टक्‍क्‍यांनी कोसळले होते. त्याचबरोबर आता बऱ्याच पतमानांकन संस्थांनी लघु आणि दीर्घ पल्ल्यात कंपनीचे भविष्य फारसे चांगले नसल्याचे सूचित केले आहे. या कारणामुळे आजही जेट एअरवेजच्या शेअरच्या भावात 6 टक्‍क्‍यांची घट झाली.

मुंबई – जागतिक परिस्थिती खराब होत चालली आहे. चीनचा विकासदर केवळ 6.5 टक्‍के मोजला गेला आहे. त्याचबरोबर जागतिक विकासदर कमी होत असल्यामुळे जागतिक शेअरबाजारातील निर्देशांक कमी होत आहेत.

12 वर्षात प्रथमच ऍपल कंपनीने आता महसूल कमी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेअरबाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्यातच केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी योजना आणण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. या कारणामुळे भारताच्या आर्थिक शिस्तीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम कालच्याप्रमाणे आजही शेअरबाजारावर होऊन निर्देशांक कोसळले.

गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1.05 टक्‍क्‍यांनी म्हणजे 377 अंकांनी कमी होऊन 35513 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 120 अंकांनी कमी होऊन 10672 अंकांवर बंद झाला.

अमेरिकेचे शेअरबाजार कोसळल्यानंतर सकाळी आशियायी शेअरबाजार निर्देशांकातही मोठी घट झाली. त्यामुळे कुंपनावर बसून असलेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफेखोरी केल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. त्यातच अमेरिकेचे प्रशासन ठप्प आहे. त्यातून मार्ग निघण्याची कोणतीही शक्‍यता सध्या अजिबात दिसून येत नाही.

जागतिक विकासदर कमी होणार असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निर्यातीचा आधार कमी मिळणार नसल्यामुळे धातू क्षेत्राचे शेअर कालपासून कमी होत आहेत. त्याचबरोबर औषधी आणि वाहन क्षेत्रही पिछाडीवर आहे. या क्षेत्रातील कंपन्याचे शेअर आजही 2 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले.

असे बोलले जात आहे की, केंद्र सरकार प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना प्रति एकर 4000 रुपये देण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना इतरही सवलती देण्याचा सरकारचा विचार आहे. त्याचा परिणाम सरकारच्या ताळेबंदावर होऊ शकतो या कारणामुळे शेअरबाजारात विक्रीचा जोर वाढल्याचे काही ब्रोकर्सनी सांगितले.

जागतिक नकारात्मक परिस्थितीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 621 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्याबरोबर आतापर्यंत निर्देशांकाना आधार देणाऱ्या देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 226 कोटी रुपयाचा नफा काढून घेतला. याचा परिणाम कालच्याप्रमाणे आजही रुपयाच्या मूल्यावर झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)