वर्षाच्या अखेरच्या दिवशी निर्देशांक ‘जैसे थे’

गुंतवणूकदारांचे 7.25 लाख कोटींचे नुकसान

सरलेल्या वर्षात ऑगस्टच्या शेवटी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 38989 अंकांपर्यंत वाढला होता. मात्र, नंतर त्यात 7.5 टक्‍क्‍यांची म्हणजे 2921 अंकांची घसरण झाल्यामुळे या काळात गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात 7.25 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. असे असले तरी वार्षिक पातळीवर सेन्सेक्‍स 5.9 टक्‍क्‍यांनी म्हणजे 2011 अंकानी वाढलेला आहे. जागतिक पातळीवर मात्र वार्षिक पातळीवर निर्देशांकांत घट झालेली आहे. निदेशांकांत वाढ झाली असली तरी वार्षिक पातळीवर रुपयाच्या मूल्यात मात्र तब्बल 9 टक्‍क्‍यांनी म्हणजे 509 पैशांनी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांत रुपयाच्या मूल्यात सुधारणा होऊ लागली आहे.

मुंबई  -जागतिक बाजारात सुट्ट्याचा काळ असल्यामुळे वातावरण मंद होते. त्यामुळे भारतीय बाजारातही फारशी उलाढाल न होता निर्देशांक शुक्रवारच्या पातळीवर कायम राहीले.

सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक केवळ 0.02 टक्‍क्‍यांनी म्हणजे 8 अंकानी कमी होऊन 36068 अंकावर बंद झाला. तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 2 अंकांनी कमी होऊन 10862 अंकांवर बंद झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजार चालू असताना रुपयाच्या मूल्यात वाढ झाली होती. मात्र गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून कुंपनावर बसून राहणे पसंद केले. क्रुडच्या दरात फारशी वाढ झाली नसल्यामुळे गुंतवणूकदार वाट पाहण्याच्या मनस्थितीत होते असे ब्रोकर्सनी सांगितले.

शुक्रवारच्या कामकाजाबाबत शेअरबाजारानी जाहीर केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 119 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी मात्र 1119 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

सरलेल्या वर्षात भारतीय शेअरबाजारानी जागतिक शेअरबाजाराच्या तुलनेत चांगला परतावा दिला आहे. त्याचबरोबर आगामी काळातही भारतीय शेअरबाजार चांगला परतावा देण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे. जागतिक विकासदर कमी होत आहे. त्याचबरोबर व्यापार युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अडथळे निर्माण होत आहेत.

मात्र त्यामुळे क्रुडचे दर कमी होऊन त्याचा भारताला फायदा होणार असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे. एकेकाळी क्रुडचे दर 85 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले होते. ते आता 53 डॉलरवर आले आहेत. त्यामुळे इंधन स्वस्त होऊन त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला लाभ होण्याची शक्‍यता आहे. महागाईही अटोक्‍यता राहण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)