क्रूड घसरल्याने भारतासाठी वातावरण पोषक

निर्देशांकांत वाढ चालूच : रुपया स्थिरावल्याने परदेशी गुंतवणूक वाढली


सरकारी मदतीमुळे बॅंकांचे शेअर तेजीत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई -जागतिक बाजारात जरी मंदीचे वारे घोंगावत असले तरी भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. जागतिक विकास दर कमी होणार असल्याने क्रूडची मागणी कमी होऊन क्रूडचे दर आता 53 डॉलर प्रती पिंपावर आले आहेत.

क्रूड मोठ्या प्रमाणात आयात करणाऱ्या भारताला त्याचा चांगलाच लाभ होणार आहे. त्याचबरोबर याच कारणामुळे रुपयाला चांगलाच आधार मिळत आहे. इतर देशापेक्षा भारताची उत्पादकता वाढणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहेत. यामुळे गेल्या चार दिवसांपासून शेअर निर्देशांक वाढत आहेत.

शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.74 टक्‍क्‍यांनी म्हणजे 269 अंकांनी वाढून 36076 अंकांवर बंद झाला. सकाळी निर्देशांक 400 अंकांनी वाढला होता. मात्र नंतर काही प्रमाणात नफेखोरी झाली. तर राष्टीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 80 अंकांनी वाढून 10859 अंकांवर बंद झाला. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 334 अंकानी तर निफ्टी 105 अंकांनी वाढले आहेत.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केल्याप्र्रमाणे सरकारी बॅंकांना रोख्यांच्या माध्यातून 29 हजार कोटी रुपयांची भांडवली मदत करणार आहे. त्यामुळे सरकारी बॅंकांच्या शेअरकडे गुंतवणूकदारांचा ओढा होता. रुपयाच्या मूल्यात दुपारपर्यंत 37 पैशांची वाढ झाली होती. त्याचबरोबर क्रूडचे दर 53 डॉलर प्रती पिंपावर रेंगाळत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी सध्या तरी आकर्षक वाटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 1731 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी मात्र 663 कोटी रुपयांचा नफा काढून घेतला. आज झालेल्या खरेदीचा फायदा एस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बडोदा बॅंक, स्टेट बॅंक व कोटक बॅंकेला झाला. या बॅंकांचे शेअर 2 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)