शेअर निर्देशांकाची दमदार आगेकूच

रुपया स्थिरावल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी


निवडणुकांमुळे गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्‍यता

मुंबई – जागतीक बाजारात शेअर निर्देशांक आता आणखी कमी होणार नसल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबरोबरच फेडरल रिझर्व्हविरोधातील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आता काही प्रमाणात मवाळ झाली आहे. या कारणामुळे जागतिक शेअर बाजारात स्थिर वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच क्रडचे दर आता 53 डॉलरपर्यंत कमी झाले आहेत. या कारणामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कालच्याप्रमाणे आजही वाढले.

गुरुवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.44 टक्‍क्‍यांनी म्हणजे 157 अंकानी वाढून 35807 अंकावर बंद झाला. सकाळी सेन्सेक्‍स 400 अंकांनी वाढला होता. मात्र रुपयावर आज आलेल्या दबावानंतर झालेल्या नफेखोरीमुळे सेन्सेक्‍सला ती पातळी राखता आली नाही. त्याचबरोबर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 49 अंकानी वाढून 10779 अंकावर बंद झाला.

क्रुडचे दर कमी होत असल्यामुळे परदेशीर संस्थागत गुंतवणूकदार आता खरेदी करू लागले असल्याचे बाजारात वातावरण आहे. काल या गुंतवणूकदारांनी 80 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 137 कोटी रुपयाचा नफा काढून घेतला. बीएनपी परिबाचे संचालक हेमांग जानी यांनी सांगितले की सध्या जागतीक शेअर बाजारात सुटीचा काळ आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मोठे निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.

क्रुडचे दर कमी होत आहेत, हे भारतासाठी वरदान ठरत आहे. एकेकाळी 85 डॉलरवर गेलेले क्रुडचे दर आता केवळ 53 डॉलरवर आले आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच लाभ होणार असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. त्यामुळे आगामी काही काळ तरी भारतातील शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्‍यता आहे. आज झालेल्या खरेदीचा फायदा रिलायन्स, इन्फोसिस, एनटीपीसी, पॉवरग्रीड, एशियनपेन्टस्‌, आयटीसी कंपन्यांना झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)