गुंतवणूकदारांना 2.26 लाख कोटींचा फटका

मुंबई – जगातून आलेल्या नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचे मूल्य एकाच दिवसात 2.26 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. शेअर बाजारातील विक्रीचा जोर इतका जास्त होता की मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी संबंधातील बहुतांश कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले. गेल्या काही दिवसातील पडझडीमुळे आता शेअर बाजारातील 220 कंपन्यांच्या शेअरचे भाव 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत.

आज सेन्सेक्‍स 1.59 टक्‍क्‍यांनी म्हणजे तब्बल 572 अंकांनी कोसळून 35312 अंकांवर तर निफ्टी 182 अंकांनी कोसळून 10601 अंकांवर बंद झाला. त्यातच उद्या महत्वाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडून एक्‍झिट पोल निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे कुंपणावर बसून असलेल्या गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा काढून घेतला असल्याचे बोलले जाते. आज शेअर बाजारात 251 कंपन्यांच्या व्यवहारावेळी शेअर जास्त घसरत असल्यामुळे व्यवहार काही काळ बंद ठेवावे लागले. 159 कंपन्यांचे शेअर कमी होण्याची शक्‍यता ब्रोकर्सनी तांत्रिक विश्‍लेषणानंतर व्यक्‍त केली.

अमेरिका आणि चीनदरम्यानचे व्यापार युद्ध अंशतः शमण्याची शक्‍यता असतानाच चीन हॉंगकॉंगमधील एका महत्वाच्या कंपनीच्या पदाधिकारी महिलेला कॅनडामध्ये अटक होऊन अमेरिकेत प्रत्यार्पणाची शक्‍यता वाढली आहे. अमेरिकेने चीनविरोधात बौद्धिक संपदेच्या भंगाबद्दल युद्ध पुकारले आहे. त्याचाच भाग म्हणून ही अटक केली असल्याचे बोलले जाते.

त्याच बरोबर अमेरिकेने इराणवर अणू कार्यक्रमाच्या विरोधात लावलेल्या निर्बंधांचा भंग होण्याचा संबंधही या अटकेला लावला जात आहे. या घटनाक्रमानंतर केवळ चीन आणि हॉंगकॉंग नाही तर आशिया खंडातील इतर देश, युरोप आणि अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या निर्देशांक कोसळले. त्याचा संसर्ग भारतीय शेअर बाजाराच्या शेअर बाजारांनाही झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)