चार दिवसांत 9 लाख कोटींचे नुकसान

शेअरबाजार निर्देशांकाचे कोसळणे चालूच

तेल कंपन्या पिछाडीवर

केंद्र सरकारने काल इंधनाच्या दरात कपात जाहीर केल्यानंतर आज तेल कंपन्याचे शेअर 25 टक्‍क्‍यापर्यंत कोसळले. तेल कंपन्याना महाग क्रुड आयात करावे लागणार आहे. त्यावर प्रक्रीया करून त्याना ते बाजारात विकावे लागते. मात्र सरकारने इंधनाचे दर कमी केल्यामुळे ही तूट कोण देणार हा प्रशन निर्माण झाला आहे. त्याचा फटका काही प्रमाणात तरी तेल कंपन्याना बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तेल कंपन्याच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्‍यता असल्यामुळे तेल कंपन्याचे शेअर कोसळत आहेत. केंद्र सरकारच्या महसूलात तूट आहे. त्याचबरोबर ती कमी होण्याची शक्‍यता कमी आहे. या कारणामुळे कपात केलेल्या दराचा तेल कंपन्यावर काही प्रमाणात तरी परिणाम होईल असे गुंतवणूकदारानां वाटते. सरकारने गेल्या अनेक महिन्यापासून क्रुडचे दर वाढत असतांना देशातील इंधनाचे दर वाढू दिले होते. मात्र आता इंधनाचे दर फारच वाढले आहेत. त्याचबरोबर आगामी काळात काही राज्यात निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात सरकार हस्तक्षेप करणे अपेक्षित होते. त्याप्रमारे सरकारने हस्तक्षेप केला आहे. आज एचपीसीएल कंपनीचे शेअर 25 टक्‍क्‍यानी तर भारत पेट्रोलीयम कंपनीचे शेअर 21 टक्‍क्‍यांनी कमी झाले.

नवी दिल्ली, दि. 5-रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने रेपो दरामध्ये कोणताही बदल न केल्याने शेअरबाजार निर्देशांकांचे कोसळणे चालूच राहिले. पतधोरण जाहीर झाल्यानंतर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 792 अंकांची कोसळून 34376 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीही 282 अंकांनी कोसळून 10316 वर स्थिरावला.

शेअरबाजारात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. त्याचबरोबर गेल्या पाच आठवड्यापासून शेअरबाजारात गळती चालू आहे. या आठवड्यात सेन्सेक्‍स 1850 अंकानी तर निफ्टी 614 अंकानी कमी झाला आहे.

शेअरबाजारात सकाळपासून विक्री चालू होती. रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण जाहीर केल्यानंतर विक्रीचा जोर वाढल्याचे दिसून आले. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2760 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. अमेरिकन कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. त्याचबरोबर अमेरिका आणखी व्याजदरात वाढ करणार आहे. या कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत आहेत. आज इतर कंपन्याचे शेअर कोसळत असताना रुपया घसरत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर मात्र वाढले.

टाटा स्टील, पॉवर ग्रीड, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बॅंक, भारती एअरटेल, यस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, अदाणी पोर्टस्‌, कोटक बॅंक, टीसीएस, वेदांता लि., आरआयएल, सन फार्मा, एसबीआय, एलअँडटी, विप्रो, इंडसइंड बॅंक, ऍक्‍सिस बॅंक यांचे समभाग घसरले. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, भारताची वाढती व्यापारी तूट, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांत वाढ केली जाण्याची शक्‍यतेमुळे ही बाजाराच्या घसरणीची आणखी काही कारणे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)