शेअरबाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा

तीन दिवसांनंतर शेअर निर्देशांकांत समाधानकारक वाढ


जागतिक शेअरबाजारात नकारात्मक वातावरण कायम

मुंबई – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे बुधवारी सकाळीही शेअरबाजार निर्देशांकांत मोठी घट झाली होती. मात्र, नंतर बरीच खरेदी झाल्यामुळे तीन दिवसानंतर निर्देशांकांत वाढ झाल्याचे दिसून आले. बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशाकं सेन्सेक्‍स 0.51 टक्‍क्‍यांनी म्हणजे 179 अंकांनी वाढून 35649 अंकावर बंद झाला. आज एकाच दिवसात सेन्सेक्‍समध्ये 700 अंकांचा चढउतार पाहायला मिळाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 66 अंकांनी वाढून 10729 अंकांवर बंद झाला.

वित्तीय संस्था आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी करणे आज गुंतवणूकदारांनी पसंद केले. अमेरिकेची व्याजदर वाढ आणि व्यापारयुद्धामुळे जागतिक शेअरबाजारातून या वर्षी नकारात्मक परतावे आले आहेत. मात्र, भारतीय शेअरबाजारांनी काही प्रमाणात का होईना सकारात्मक परतावा दिला असल्याचे बीएनपी परिबाचे संचालक हेमांग जानी यांनी सांगितले.

विशेष म्हणजे जागतिक बाजारात कमालीचे नकारात्मक वातावरण असतानाही रुपयाच्या मूल्यात मात्र वाढ होत आहे, कारण भारताची अर्थव्यवस्था उत्तम आहे. 85 डॉलरवर गेलेले क्रुडचे दर आता केवळ 51 डॉलरवर आले आहेत.

त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच लाभ होणार असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. परवा परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 577 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 186 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)