जागतिक वातावरण बिघडल्याने निर्देशांकांची घसरण सुरूच

File photo

मुंबई – देशातील परिस्थिती ठिकठाक असतानाही जागतिक वातावरण बिघडत चालले असल्यामुळे शेअरबाजारात विक्रीचा धुमाकूळ चालूच आहे. त्यातच भारतात आता निवडणुकांचे वेध लागले असल्यामुळे गुंतवणूकदार ताकही फुंकून पिण्याच्या मनस्थितीत आहेत.

सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 271 अंकांनी कमी होऊन 35470 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 90 अंकांनी कमी होऊन 10663 अंकांवर बंद झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुक्रवारी सेन्सेक्‍स 572 अंकांनी कोसळला होता. बाजारातील घडामोडीबाबत बोलताना एस्सेल म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी विराल बारेवाला यांनी सांगितले की, निवडणुका आणि जागतिक नकारात्मक परिस्थितीमुळे कुंपणावर बसून असलेले गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे चित्र बाजारात आहे.

त्यामुळे सोमवारी रिऍल्टी क्षेत्राचा निर्देशांक 2.29 टक्‍क्‍यांनी, धातू क्षेत्राचा निर्देशांक 2.16 टक्‍क्‍यांनी, ग्राहक वस्तू क्षेत्राचा
निर्देशांक 1.67 टक्‍क्‍यांनी, वाहन क्षेत्राचा निर्देशांक 1.38 टक्‍क्‍यांनी, भांडवली वस्तू क्षेत्रांचा निर्देशांक 0.97 टक्‍क्‍यांनी कोसळला. विशेष म्हणजे आज तेल कंपन्यांचे शेअरही 1.6 टक्‍क्‍यांपर्यंत कोसळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)